'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम गिरीजा आधीच मालिकेतील अभिनयाने घराघरात पोहोचली आहे.
मात्र ही अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया हँडलवरील मनमोहक फोटोजने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
नुकतेच तिने पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या आकर्षित ड्रेसमध्ये काही फोटोज इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
तिचे हे फोटो जो कोणी बघेल तो तिच्या प्रेमात पडेल असे तिचे फोटोज आहेत.
हल्ली तिच्या फोटोजचं भलतंच वेड चाहत्यांना लागलंय.
गिरीजा हल्ली तिच्या घायाळ करणाऱ्या फोटोजने चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. तर दुसरीकडे तिच्या मालिकेतील भूमिकेने देखील ती चाहत्यांची आवडती होताना दिसतेय.
याआधीही तिने ब्लू गाऊनमध्ये फोटोशुट केला होता. तिच्या गाऊनवर जणू आकाशातले चांदणेच लागले असावे असे तिचे फोटोज होते.