लग्नासाठी मुलगी बघायला जाताना, पहिल्या भेटीतच कसं ओळखायचा स्वभाव..? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.
तिच्यासमोर फोनवर बोलताना एखाद्या मैत्रिणीचा उल्लेख करा आणि त्यावर तिचे एक्स्प्रेशन काय येतात याकडे लक्ष द्या.
मुलीला तुमचे ध्येय, स्वप्न सांगा. महत्वाकांक्षा सांगा. सकारात्मक मुली त्याला प्रोत्साहन देतील. साध्या मुली भाळतील तर स्वार्थी मुली स्वतःचे स्वप्न तुमच्यावर लादतात.
भविष्यात माझा जॉब गेला किंवा दारु, सिगारेट, पार्ट्या केल्या तर? असे प्रश्न विचारून बघा. त्यावर येणाऱ्या उत्तराची तीव्रता तुम्हाला तिची प्रगल्भता सांगू शकेल.
एखादा अडचणीत टाकणारा प्रश्न विचारून बघा. त्यावर ती कशी रिअॅक्ट होते, घाबरते की, गोंधळते, सारवासारव करते की, काँफीडंट असते हे बघा.
मुलींना स्वातंत्र्य हवं असतं. त्यामुळे जरा बंधनं आणणारे प्रश्न विचारुन बघा. ती कशी प्रतिसाद देते याचा अंदाज घ्या.
तसं तर वर्षानुवर्ष संसार करुनही एकमेकांना पुर्ण ओळखता येत नाही. पण या गोष्टी अंदाज बांधायला मदत करतात.