Simala Prasadशिमला प्रसाद यांची जबरदस्त प्रेरणादायी जीवनकाहणी आहे.
मध्य प्रदेशातील भोपळच्या रहिवासी असलेल्या शिमला प्रसाद यांनी बॉलिवूडच्या सिनेमांतही कामं केली आहेत.
सिल्व्हर स्क्रीनवर त्या जेवढ्या प्रेमळ आणि आकर्षक वाटतात तितक्याच त्या गुन्हेगारांविरोधात कडक आहेत.
८ ऑक्टोबर १९८० चा त्यांचा जन्म असून त्यांना लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयाची आवड होती.
शालेय जीवनात त्यांनी डान्स, अभिनय नंतर कॉलेजमध्ये नाटकांमधूनही कामं केली.
शिमला प्रसाद यांचे वडील डॉ. भागीरथ प्रसाद हे १९७५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
बरकतुल्लाह विद्यापीठात त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं आहे.
मध्य प्रदेश सरकारची लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील त्यांनी उत्तीर्ण केली आहे.
गोल्ड मेडलिस्ट, बॉलिवूड अभिनेत्री ते आयपीएस अधिकारी हा शिमला प्रसाद यांचा प्रवास जबरदस्त आहे.