गुगलने सांगितले की AI पावर्ड फिचर्स पहिल्यांदाच गुगल डॉक्स आणि जीमेलमध्ये देण्यात येणार आहेत.
सध्यातरी हे AI फीचर्स हे इंग्रजी भाषेत आणि फक्त अमेरिकेतच उपलब्ध असणार आहेत.
तसेच गुगलने दिलेल्या माहितीनुसार हे फिचर्स आगदी काही आठवड्यांमध्ये फक्त मोजक्या टेस्टर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येतील.
जीमेल वापरकर्त्यांना ड्राफ्ट, रिप्लाय, समरीज आणि प्रायोरिटीज यासाठी खास फीचर्स मिळतील.
तर वापरकर्त्यांना गुगल डॉक्समध्ये विचारमंथन, शुद्धलेखन, लिहिणे आणि पुन्हा त्यात सुधारणा करण्यासाठी एआय बेस्ड खास ऑप्शन मिळतील.
स्लाइडमध्ये वापरकर्त्यांना त्यांच्या सर्जनशील कल्पना ऑटो-जनरेटेट फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओच्या मदतीने मांडता येणार आहेत.
SHEET मध्ये वापरकर्त्यांना ऑटो-कम्प्लीशन फीचर वापरून रॉ डेटाच्या मदतीने माहितीचे वर्गिकरण आणि विश्लेषण करता येईल.
गुगल मीट मध्ये नवीन बॅकग्राउंड सेट करता येईल आणि नोट्स कॅपचर देखील करता येतील.
तसेच चॅटमध्ये देण्यात आलेले एआय फिचर तुमचा वर्कफ्लो सुधारण्यात मदत करेल.