ग्रीन टीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी काही प्रकरणांमध्ये याचे सेवन केल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
ग्रीन टीचे सेवन दररोज संतुलित प्रमाणात केले पाहिजे, याशिवाय काही समस्यांमध्ये ग्रीन टी पिणे देखील टाळले पाहिजे.
2 ते 3 कप पेक्षा जास्त ग्रीन टी पिल्याने गंभीर डोकेदुखी होऊ शकते. तसेच तुम्हाला मायग्रेनच्या समस्येचा धोका असतो.
जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने पोट आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे तुमच्या पोटात दुखणे आणि अपचनाची समस्या होऊ शकते.
जास्त ग्रीन टी प्यायल्याने झोपेशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात, झोप वेळेवर न लागण्याचे प्रमाण वाढेल.
ग्रीन टीमध्ये टॅनिनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे अति सेवना मुळे उलट्या होऊ शकतात.
जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने तुमचा रक्तदाब कमी होतो आणि इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात
त्यामुळे कोणत्याही समस्या असल्याच तसेच ग्रीन टीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.