Hair Care : शॅम्पू करताना टाळा 'या' ५ चुका

| Sakal

कोरडे निर्जीव केस कोणालाही आवडत नाहीत. काळजी घेण्यासाठी कोणी घरगुती उपाय तर कोणी पार्लरचे उपाय करतात.

| Sakal

शॅम्पू आणि कंडिशनर केसांना बाऊंसी आणि रेशमी बनवतात. त्यामुळे आपापल्या केसांनुसार शॅम्पू निवडले जातात.

| Sakal

काही लोक आठवड्यातून एकदा तर काही एक दिवसा आड कोसांना शॅम्पू करतात. आपल्याला योग्यारित्या शॅम्पू कसा करावा हे समजून घ्यायला हवे.

| Sakal

काही लोक शॅम्पू योग्य निवडतात पण लावताना काही चुका करतात, त्यामुळे केस कोरडे आणि निश्तेज होतात.

| Sakal

शॅम्पू करणे मोठी गोष्ट नाही पण काहींना शॅम्पू करण्याची योग्य पध्दत माहित नसते. म्हणून या खास टिप्स देत आहोत.

| Sakal

शॅम्पू करताना गरम पाणी वापरू नका. गरम पाणी आणि शॅम्पू यामुळे केस खराब होतात.

| Sakal

बहुतेक लोक डोक्यावर एकाच ठिकाणी शॅम्पू लावतात. तिथूनच केस धुवायला सुरूवात करतात. त्यामुळे तेवढाच भाग कोरडा होतो.

| Sakal

काही लोक शॅम्पू लावल्यावर केसांना जोराने घासतात. असे घासण्याऐवजी हलक्या हाताने मसाज करा.

| Sakal

शॅम्पू करण्यापूर्वी केस नीट ओले करा. केस नीट ओले नाही झाले तर शॅम्पूचा काहीच उपयोग नाही.

| Sakal