नव्वदच्या दशकातील बॉलीवूडच्या त्या काळातही सोनाली बेंद्रेचे सौंदर्य आणि तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना खूप आकर्षित केले.
कॅन्सरसारख्या भयंकर आजारावर मात करणारी सोनाली बेंद्रे आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे.
बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सोनालीचा जन्म 1 जानेवारी 1975 रोजी मुंबईत झाला.
सोनालीने तिचा अभिनय आणि चेहऱ्यावरील निरागसपणाच्या जोरावर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.
सोनालीने 1994 मध्ये रिलीज झालेल्या 'आग' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
२०१८ मध्ये सोनालीला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचं समजलं. या गंभीर आजाराबाबत समजल्यानंतर सोनाली पूर्णपणे खचली होती.
उपचारानंतर आता सोनाली पूर्णपणे बरी झाली आहे.