भारतीय क्रिकेट संघातील स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांज्या आणि ऋषभ पंत टीम इंडीयासाठी उपयुक्त खेळाडू ठरत आले आहेत.
आज आपण या दोन खेळाडूंमध्ये कोणाच्या नावावर किती शतके आणि अर्धशतके आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत.
हार्दिक पांड्या बद्दल बोलायचे झाल्यास त्याच्या नावावर ११ टेस्ट , ६६ वनडे आणि ८१ टी-२० सामने खेळण्याचा अनुभव आहे.
यादरम्यान पांड्याने १ शतक आणि ४ अर्धशतकं तसेच टी-२० इंटरनॅशनलमध्ये ३ अर्धशतकं केले आहेत.
आयपीएल करियर बद्दल बोलायचे झाल्यास पांड्याने १०७ सामन्यांमध्ये ८ अर्धशतकं नोंदवली आहेत.
गोलंदाजीत हार्दिकने टेस्ट मध्ये १७ विकेट, वनडेमध्ये ६३, टी-२० मध्ये ६२ आणि आयपीएल मध्ये ५० विकेट घेतले आहेत.
पंतबद्दल बोलायचे झाल्यास पंतने ३३ टेस्ट्स, ३० वनडे आणि ६६ टी-२० सामने खेळले आहेत.
यामध्ये टेस्टमध्ये ५ शतकं आणि ११ अर्धशतके, वनडेमध्ये १ शतक आणि ५ अर्धशतके तसेच टी-२० इंटरनॅशनल मध्ये ३ अर्धशतके नावावर केले आहेत.
तसेच पंतने आयपीएल करियरमध्ये ९८ सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने एकूण १५ अर्धशतके केली आहेत.
पंतने टेस्ट क्रिकेटमध्ये २२७१, वनडेमध्ये ८६५, टी-२० मध्ये ९८७ आणि आयपीएलमध्ये २८३८ धावा केल्या आहेत, तर पांड्याने टेस्टमध्ये ५३२, वनडेमध्ये १३८६, टी-२० मध्ये ११६० धावा आणि आयपीएल मध्ये १९६३ धावा केल्या आहेत.