Health Tips: पायात सारखे गोळे येताय? सावधान, 'ही' असू शकतात कारणं

| Sakal

पायात गोळे येणं ही खरंतर खूपच कॉमन तक्रार असते. विशेषत:30 ते 55 या वयोगटातील महिलांमधे ही तक्रार प्रामुख्याने आढळते.

| Sakal

बायका सतत पायात गोळे येण्याची तक्रार करत असतात. गोळे येणं हे थोड्या वेळापुरती असतं पण त्या वेदना असह्य असतात.

| Sakal

सतत पायात गोळे येण्यामागची आधी कारणं माहित असायला हवीत. कारण बरीचशी कारणं ही सवयींशी, उठण्या बसण्याशी निगडित असतात.

| Sakal

खूप वेळ खूर्चीत बसून काम करणं, हालचाल कमी होणं, चुकीच्या पध्दतीने हालचाली यामुळे पायात गोळे येतात.

| Sakal

पायाला स्ट्रेचिंगची गरज असते. पण जर स्नायूंना ते योग्याप्रमाणात मिळाले नाही तर स्नायू शिथील होतात.

| Sakal

तासन् तास उभं राहून काम केल्याने रक्त प्रवाह पायाकडे वाढतो. हृदयाच्या दिशेने कमी होतो. त्यामुळे रक्त वाहिन्यांच्या झडपा हव्या तशा क्रियाशील राहत नाहीत.

| Sakal

अति व्यायाम, ट्रेकिंग केल्यावरही स्नायूंवर ताण येतो, त्यामुळेही पायात गोळे येतात.

| Sakal