चांगले आरोग्य कमवण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण धडपड करत असतात. त्यासाठी व्यायम, आहार या गोष्टींकडे लक्ष दिले जाते.
बिघडलेली दिनचर्येमुळे बऱ्याच जणांना व्यायम आणि योग करायला वेळ मिळत नाही.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना रात्री उशीर झोपणे आणि सकाळी उशीरा उठण्याची सवय असते.या सवयींचा आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होतो.
आज आपण रात्री उशीरा झोपण्याचे तोटे जाणून घेणार आहोत.
काही अभ्यासानुसार रात्री उशीरा झोपणाऱ्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा धोका असतो.
पुरेशी झोप न घेतल्याने तुमचे वजन वाढण्याचा धोका देखील असतो.
रात्री उशीरा झोपल्याने सकाळी लवकर उठावे लागले तर शरिरात हॅप्पी हार्मोंस कमी होतात आणि स्ट्रेस, डिप्रेशन वाढू शकते.
रात्री उशीरा झोपल्याने डोळ्यांशी संबंधीत गंभीर आजार होऊ शकतात.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, अधिकच्या सल्ल्यासाठी तज्ञांना भेटा.