Health Tips : स्टॅमिना वाढवायचाय? ट्राय करा 'या' टिप्स

| Sakal

शिड्या चढताना, धावताना, वर्क आऊट करताना धाप लागणं, खूप घाम येणं अशा समस्या अनेकांना उद्भवतात.

| Sakal

स्टॅमिना वाढल्याने तुम्हाला अस्वस्थता किंवा तणावाचा सामना करण्यास मदत होते. त्यामुळे थकवाही कमी होतो. जाणून घेऊया, स्टॅमिना वाढवण्यासाठी काय खावे?

| Sakal

बीटरूट खूप फायदेशीर आहे. कारण त्यात आढळणारे नायट्रेट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि रक्तप्रवाह नियंत्रित करतात.

| Sakal

ओट्सचे सेवन करा कारण त्यात चांगले कार्ब आहेत. सर्व कार्बोहायड्रेट वाईट नसतात, तुम्हाला फक्त योग्य कर्बोदके निवडण्याची गरज आहे.

| Sakal

व्यायाम करण्यापूर्वी केळीचे सेवन केल्याने तुम्हाला चांगली ऊर्जा मिळते. केळीमध्ये भरपूर फायबर असते आणि ते कार्बोहायड्रेट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे.

| Sakal

ब्राऊन राईसमध्ये स्टार्चचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. अशावेळी ते तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. स्टॅमिना टिकवून ठेवण्यासही मदत करते.

| Sakal

पालकामध्ये जीवनसत्त्वे ए, सी, ई, के आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोह असते. जे तुम्हाला फिट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

| Sakal