'या' कारणांमुळे तरुणांना येताय हार्ट अटॅक

| Sakal

हृदय स्वास्थ्याच्या बाबतीत निष्काळजीपणामुळे गेल्या काही वर्षांपासून मोठ्या संख्येने तरुण हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत.

| Sakal

हृदयविकाराच्या सर्व कारणांमध्ये डायबिटीज पहिल्या क्रमांकावर आहे.

| Sakal

रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) नियंत्रणात नसेल तर ते हृदयविकाराचे कारण बनते.

| Sakal

बदलेल्या जिवनशैलीमुळे येणारा ताण तणाव हे देखील हृदयविकाराचा झटका येण्यासाठीचे प्रमुख कारण बनले आहे.

| Sakal

आजच्या युगात सिगारेट ओढणे ही एक फॅशन बनली आहे. धुम्रपानामुळे अनेकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.

| Sakal

कुटुंबात इतर व्यक्तींना हृदयविकाराचा झटका आलेला असेल तर त्या कुटुंबातील तरुणही अनुवांशिकरित्या हृदयविकाराचे बळी ठरू शकतात.

| Sakal

वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा हृदयाच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. यामुळेही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

| Sakal

अतिप्रमाणात जंकफूड सेवन हेही हृदयविकाराचे कारण बनु शकते.

| Sakal

जीवनशैली बदलून आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवले तरच हा धोका टाळता येऊ शकतो.

| Sakal