Herbal Tea : अभिनेत्रींसारखा ग्लो मिळवायचाय? बनवा असा हेल्दी चहा

| Sakal

तुमच्या नेहमीच्या चहामध्ये काही गोष्टींचा समावेश केला तर तो पूर्वीपेक्षा अधिक निरोगी होऊ शकतो.

| Sakal

आल्याचा चहा तुम्हाला सर्दी, खोकला आणि फ्लूची समस्या यापासून टाळण्यास मदत करतो. यामुळे तुमचा चहा केवळ चवदारच नाही तर तो आरोग्यदायीही होतो.

| Sakal

चहामध्ये लोणी टाकणे तुमच्या पचनसंस्थेसाठी टॉनिक म्हणून काम करते. हे पचनसंस्थेला नैसर्गिकरित्या वंगण घालण्याचे आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देण्याचे काम करतात. 

| Sakal

तुळशी हंगामी फ्लू, व्हायरल फ्लू आणि ताप कमी करण्यास आणि प्रतिबंध करण्यास मदत करते. म्हणूनच चहा करताना त्यात तुळशीची पाने टाका. 

| Sakal

 दूध किंवा साखर न टाकता तुम्ही दालचिनीचा चहा तयार करा. तुम्हाला हवे असल्यास यात तुम्ही थोडा मधही टाकू शकता. 

| Sakal

काळा चहा बनवा आणि त्यात थोडा लिंबाचा रस घाला किंवा लिंबाचा तुकडा कापून चहाच्या कपमध्ये घाला. याचे सेवन केल्याने तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटेल.

| Sakal

चहामध्ये थोडी बडीशेप टाकून तो उकळवा. यामुळे तुम्हाला पोटदुखीपासून आराम मिळू शकतो. मासिक पाळीच्या क्रॅम्पसाठीही हा एक चांगला नैसर्गिक उपाय आहे.

| Sakal