औरंगाबाद शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणून ओळखलं जातं. शहरामध्ये मोहमंद-बीन-तुघलक यांच्या काळामध्ये सैन्यासोबत आलेली नान रोटी प्रसिद्ध आहे.
औरंगाबादकरांना या नान रोटीने भुरळ घातली आहे.मुस्लिम कुटुंबांमध्ये कोणताही समारंभ असो नान रोटीला मोठी मागणी असते.
औरंगाबाद शहराने नगरची निजामशाही, मोगलशाही आणि नंतर हैदराबादची निजामशाही अशा शाही सल्तनती पाहिल्या.
मोहमंद-बीन-तुघलक यांच्या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था व्हावी. यासाठी नान रोटी हा पदार्थ त्यांनी सैन्याच्या जेवणासाठी समाविष्ट केला होता.
ही नान रोटी खाल्ल्यानंतर दिवसभर जेवणाची गरज भासत नाही. स्पेशल खलियासोबत नान रोटी खाली जाते. नान रोटीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती लवकर खराब होत नाही.
गव्हाचे पीठ, रवा, मैदा, सोडा, ईस्ट पावडर, बडीशेप, हळद, मीठ, यापासून नान रोटी तयार केली जाते.