ॲपलच्या लोगोमधील सफरचंद हे अर्ध खाल्लेलं का असते?

| Sakal

ॲपलचा पहिला लोगो आयझॅक न्यूटन हा झाडाखाली बसलेला होता.

| Sakal

ॲपलचा सर्वात पहिला लोगो सन १९७६ मध्ये रोनाल्ड वेन यांनी बनवलेला.

| Sakal

हाताने तयार केलेला असल्यामुळे लोगोला विंटेज व जुनाट फील यायचा. म्हणूनच तो लोगो स्टिव्ह जॉब्स यांनी बदलण्याचा निर्णय घेतला.

| Sakal

१९७७ मध्ये नवीन लोगो बनवण्यासाठी रॉब जानॉफ या ग्राफिक डिझायनरला बोलावण्यात आलं. रॉब यांनी इंद्रधनुषी रंगाने भरलेला ॲपल लोगो डिझाईन केला.

| Sakal

त्यानंतर इंद्रधनुषी रंगाच्या अॅपलच्या लोगोमध्ये दोन तर्क वितर्क लावण्यात आले.

| Sakal

कृत्रिम बुद्धिमत्ताचे जनक म्हणून ओळखले जाणारे अॅलन ट्युरिंग यांचा मृत्यू विषारी सफरचंद खाल्यामुळे झाला होता. त्यावेळी त्यांच्या मृत शरीराजवळ सायनाईड ने माखलेलं अर्धवट खाल्लेलं सफरचंद मिळालं होतं.

| Sakal

समलिंगी असल्यामुळे झालेल्या यातनेला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. या सत्य घटनेवरून प्रेरित होऊन तसेच LGBTQI समुदायाला ध्यानात घेऊन ॲपलचा लोगो अर्धा व इंद्रधनुषी आहे, असे काहींना वाटले.

| Sakal

या दोन गोष्टी विचारात घेऊन १९९८ मध्ये पुन्हा लोगो बदलण्यात आला.

| Sakal

जर संपूर्ण सफरचंद लोगो मध्ये ठेवले असते, तर ते चेरी हे फळ आहे, असे वाटले असते. लोकांचा गोंधळ उडला असता म्हणून अॅपलचा लोगो सफरचंद उष्ट दाखवण्यात आले आहेत.

| Sakal