Kolhapur : 'आई अंबाबाई.. सगळ्यांना सुखी ठेव'; अमित शाहांची अंबाबाई चरणी प्रार्थना

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अंबाबाईचं दर्शन घेतलं.

यावेळी गृहमंत्री शाह यांनी पत्नी सोनल अमित शाह यांच्यासह कुंकूमार्चन पूजा केली.

तसंच शाह यांनी 'आई अंबाबाई, सर्वांना सुख, समृध्दी दे!' अशी प्रार्थनाही केली.

यावेळी मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

तसेच आमदार गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची देखील उपस्थिती होती.

शिवाय, समरजितसिंह घाटगे, महेश जाधव, राहुल चिकोडे, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

गृहमंत्री शाह आणि पत्नी सोनल अमित शाह यांनी अंबाबाई चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली.

गृहमंत्री शाह यांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्कार केला.

दरम्यान, गृहमंत्री शाह, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा अंबाबाईची प्रतिमा देवून पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Minister Amit Shah visited Ambabai Temple Kolhapur