फक्त बोलतात करत काहीच नाहीअशा लोकांपासून लांब राहा कारण यामुळे तुमचा नकारात्मक दृष्टीकोन तयार होऊ शकतो.
सतत नशिबाला दोष देणाऱ्या लोकांपासून चार हात लांब राहणं कधीही योग्यच असतं.
काही लोकांना सतत तुमच्यावर संशय घेण्याची सवय असते. अशा संशयी लोकांपासून देखील दुर रहा.
ज्या लोकांना सतत प्रत्येक लहान सहान प्रश्नाचं उत्तर हवं असतं अशा लोकांपासून दूर राहणंच चांगलं आहे.
जे लोक काहीही विचार न करता बोलतात त्यांच्यापासून लांब राहा.
तुमच्या कामाचं श्रेय घेणाऱ्या लोकांपासून लांब राहा.
मित्र म्हणून तुमच्यावर जळणारे लोक याशिवाय जे लोक कोणत्याही मोहाला बळी पडतात त्यांच्यापासून लांब राहा.