आता उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे भरपूर घाम येईल. अशा वेळी घामाचा वास घालवण्यासाठी काय कराल ?
आंघोळीच्या आधी लिंबाचा रस आणि बेकींग सोडा काखेत लावा.
आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल घाला.
आंघोळीच्या पाण्यात सैंधव मीठ घाला.
ग्रीन टी बॅग्ज काखेत दाबून ठेवा आणि नंतर आंघोळ करा.
आंघोळीच्या आधी टॉमेटोचा रस अंगाला लावा.
कडुनिंबाच्या पाण्याने आंघोळ करा.
जास्त घाम येणाऱ्या भागात टी ट्री ऑइल लावा.