भेसळयुक्त मिठाई कशी ओळखाल?

| Sakal

सणासुदीच्या काळात मिठाईच्या व्यवसायात मोठी वाढ होताना दिसते. 

| Sakal

अनेक व्यापारी अधिक नफा मिळवण्यासाठी, कमी दर्जाचं साहित्य वापरुन भेसळयुक्त मिठाई ग्राहकांना विकताना दिसतात. 

| Sakal

त्यामुळे मिठाई घेताना ती भेसळयुक्त आहे की नाही हे तपासून मगच घ्या.

| Sakal

मावा हातात घेऊन तो  अंगठ्याने रगडा. 

| Sakal

जर माव्यात तेलकट पदार्थ जाणवला आणि मावा सुखा न झाल्यास तो योग्य मावा असल्याचं समजावं. 

| Sakal

माव्याचे तुकडे तोंडात टाकताच त्याला विशिष्ट प्रकारचा तेलकट वास आला तर तो मावा भेसळयुक्त असू शकतो

| Sakal

मावा हातावर काही वेळ रगडून त्याच्या वासावरुनही तो मावा चांगल्या दर्जाचा आहे की नाही ते ओळखता येईल

| Sakal

माव्याचा छोटासा तुकडा घेऊन त्यावर टिंचर आयोडिनचे (tincture iodine)तीन ते चार थेंब टाका.

| Sakal

पण जर मावा भेसळयुक्त असेल तर, ज्या ठिकाणी टिंचर आयोडिनचे थेंब टाकले आहेत, माव्याचा तो भाग काळा होईल.

| Sakal

त्या जागेवर एक काळा डाग होईल.

| Sakal

काळा डाग आल्यास मावा नकली, भेसळयुक्त असल्याचं समजावं.

| Sakal