पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्यात गरमागरम खावसं वाटतं. आज आम्ही तुम्हाला हेल्दी मिश्र डाळींचे आप्पे यांची रेसिपी जाणून घेणार आहोत.
आप्पे रेसिपीसाठी साहित्य - तांदूळ १ भांडे, अर्धी वाटी, उडीद डाळ, अर्धी वाटी हरबरा डाळ आणि अर्धी वाटी बाजारी रवा
आप्पे करण्याच्या आदल्या दिवशी दुपारी तांदूळ, डाळी स्वच्छ धुऊन भिजत ठेवा. रात्री सर्व बारीक करा. त्यामध्ये बारीक रवा मिसळा.
पुन्हा मिश्रण काढा आणि झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी दुपारी करावयाचे असल्यास सकाळी मिश्रण हलवून ठेवा.
आप्पे करावयाच्या वेळेस पिठात एक चमचा मीठ, डावभर तेल घाला. आप्पेपात्र गॅसवर तापत ठेवा.
आप्पेपात्र तापल्यावर त्यात प्रथम थोडे तेल सोडा. त्यामध्ये वरून चमच्याने पीठ घाला. आप्पेपात्रावर झाकण ठेवा. पाच मिनिटाने झाकण काढून आप्पे खरपूस भाजून घ्या.
आप्यासोबत तुम्ही तुमच्या आवडीने दही , सॉस चटणी खाऊ शकता.