घरी सगळेच दही तयार करतात. पण ते बाजारातल्या दह्यासारखे घट्ट करायचे असेल तर काय कराल ?
दही तयार करण्यासाठी फुल क्रीम मिल्कचा वापर करा.
मातीच्या भांड्यात दही तायर करा.
कोमट दुधाचा वापर करा.
एका भांड्यात थोडेसे दही घेऊन त्यात ३-४ चमचे दुधाची भुकटी घाला.
साय असलेलं दूध घेऊन ते मंद आचेवर गरम करा. त्यानंतर गॅस बंद करून ते थंड होऊ द्या.
या दुधात दही आणि भुकटीचे मिश्रण घाला आणि ३-४ तास झाकून ठेवा.
हे मिश्रण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यास दही तयार होईल.