व्हायरल आजारांपासून दूर राहायचं असेल तर कोणते घरगुती उपाय कराल? पाहा..

| Sakal

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे दूषित पाणी, वारा, पाऊस, थंडीमुळे व्हायरल आजारांचे प्रमाण वाढले आहे.

| Sakal

सर्दी, खोकला, घसादुखी अशा काही आजारांमुळे लोक वैतागली आहेत. दरम्यान, या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता.

| Sakal

तुळशीच्या पानांसोबत आलं आणि मधाचे सेवन केल्याने या आजारांपासून दूर राहू शकता.

| Sakal

आलं विषाणूजन्य ताप कमी करण्यास मदत करते. तुम्ही आल्याची पेस्ट मधात टाकून ते मिश्रण खाऊ शकता.

| Sakal

गुळवेलचा तुकडा पाण्यात उकळून ते पाणी पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. आणि तापाची समस्या दूर होण्याची शक्यता असते.

| Sakal

काळा चहा आणि आल्याचा चहा व्हायरल फिव्हरमध्ये फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.

| Sakal

संत्र्यामध्ये व्हिटॅमीन सी असते. संत्र्याचा ज्यूस सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि तापापासून बचाव होतो.

| Sakal

धन्याच्या चहामुळे ताप कमी होतो. यासाठी दोन कप दूध आणि त्यात एक चमचा धने आणि साखर घालून ते उकळून पिऊ शकता.

| Sakal