वेळेचे भान न ठेवता आपण मोबाईलचा वापर करीत आहात का?
मोबाईल वापरण्याचा वेळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे का?
आपण विचार करता त्यापेक्षा जास्त वेळ आपण मोबाईलचा वापर करीत आहात का?
घरातून बाहेर जाताना मोबाईल आपल्या जवळ असणे अत्यावश्यक वाटते का?
सकाळी उठल्याबरोबर मोबाईल बघता का?
चुकून बाहेर जाताना मोबाईल घरी विसरल्यास बेचैन वाटते का?
थोडा वेळही मोबाईलपासून दूर राहण्यास विरोध करता का? मोबाईलचा वापर कमी करणे, आपल्या नियंत्रणाच्या बाहेर गेले आहे का?
मोबाईल शिवाय जीवन ही कल्पना भीतीदायक वाटते का ?
या प्रश्नांची उत्तरे बहुसंख्येने होकारार्थी येत असल्यास आपल्याला मोबाईलचे व्यसन लागले हे ओळखता येईल.