फक्त मांडी किंवा पोटाचीच चरबी वाढते असं नाही. गालांवर वाढलेली अतिरिक्त चरबीसुद्धा सौंदर्य बिघडवते. अशा वेळी काय कराल ?
चीकबोन स्कल्प्टरमुळे लोंबकळणाऱ्या गालांना आकार मिळतो.
एक्स आणि ओ ही इंग्रजी अक्षरे उच्चारल्याने गालांना व्यायाम मिळतो.
फुगा फुगवताना तोंडाची जशी स्थिती असते त्याप्रमाणे गाल फुगवा.
रात्री झोपण्याच्या ३ तास आधी साधे जेवण घ्या. दुपारचे जेवण आणि सकाळचा नाश्ता वेळेत करा.
मधुमेह नियंत्रणात ठेवा.
कार्डियो किंवा एअरोबिक्स करा.
वर बघून तोंड पूर्ण उघडा. नंतर बंद करा. असे २० अंक मोजून ३ वेळा करा.