थंडीत अन्न गरम व्हायला गॅस जास्त लागतो. हा गॅस वाचवायचा कसा पाहू या.
प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवल्यास गॅस कमी लागतो.
पातळ तळ असलेलं भांडं वापरा.
ओले भांडे गॅसवर ठेवू नका.
एलपीजी गॅसची ज्योत निळी असते. ती लाल-पिवळी दिसत असल्यास बर्नर स्वच्छ करा.
कडधान्ये भिजवून मगच शिजवा.
अन्न गॅसवर असताना झाकून ठेवा.
या पद्धतीने जेवण केल्यास गॅस वाचेल.