मुलींनो, अशा मुलांशी चुकूनही करू नका लग्न, आयुष्य होईल खराब

| Sakal

जोडिदाराला ओळखणे

लग्न करण्याआधी मुलींनी जोडिदाराला नीट जाणून घेणं गरजेचं आहे.

| Sakal

नात्यासाठी धोक्याची घंटा

काही सवयी असतात ज्या तुमचे नाते धोक्यात आणतात. अशा सवयी कोणत्या जाणून घेऊया.

| Sakal

बोले तैसा चाले

बोलताना मोठमोठ्या गोष्टी केल्या जातात. पण प्रत्येक्षात तसे वागतात का? जे सांगितलं ते करणं, प्रॉमिस पाळणं अशा सवयी आहेत का तपासा. नाहीतर हेच तुमच्या नात्यासाठी घातक ठरेल.

| Sakal

दुर्लक्ष करणे

तुमच्या बॉयफ्रेंड किंवा होणारा नवरा तुमच्या बोलण्याकडे, तुमच्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? असं असेल तर लग्नानंतर आयुष्य अवघड होतं.

| Sakal

डॉमिनेटींग

काही मुलं स्वतःला परफेक्ट समजतात आणि दुसऱ्याला कमी लेखतात. असं जर होत असेल तर वेळीच सावध व्हा.

| Sakal

खोटं बोलणं

लग्नाआधीच जर तो व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत असेल तर भविष्यातही तुम्ही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं शक्य नाही.

| Sakal

नात्यात एफर्ट्स न टाकणे

काही मुलं फार बेजबाबदार असतात. ते नात्यासाठी विशेष असे काही एफर्ट्स घ्यायला तयार नसतात. अशा मुलांपासून लगेच दूर झालेलं बरं.

| Sakal

वाईट वागणूक

इतरांशी वाईट वागणारा मुलगा भविष्यात तुमच्याशीही वाईट वागणार नाही याचा काही भरवसा नाही. त्यामुळे वेळीच जागे व्हा.

| Sakal

कुटुंबाला न स्वीकारणे

जर तो मुलगा तुमच्या कुटुंबाला स्वीकारत नसेल, सतत त्यांच्याविषयी वाईट बोलत असेल, तर अशा मुलाशी लग्न करणे तुमची सर्वात मोठी चूक ठरेल.

| Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

| Sakal