शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा आज ६१ वा वाढदिवस
ते शिवसेनेचे प्रमुख नेते असून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आहेत
ते उद्धव ठाकरेंच्या जवळचे आहेत, राज्यातील सत्तांतराच्या काळानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. पण ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले
शिवसेनेसोबत झालेल्या बंडाला संजय राऊत जबाबदार आहेत अशा टीका झाल्या पण ते डगमगले नाहीत
सुरूवातीच्या काळापासून त्यांनी शिवसेना, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केले
सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून ते कायम पक्षाची भूमिका मांडत राहतात
पत्राचाळ प्रकरणातील आरोपावरून ते १०४ दिवस ईडीच्या कोठडीत राहून बाहेर आले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, मला फक्त शिवसेनेची काळजी आहे