भारत श्रीलंका यांच्यात १० जानेवारीला २०२३ मधील पहिला वनडे सामना खेळला गेला.या रोमांचक सामन्यात दोन शतकं पाहायला मिळाली.
पहिलं शतक कोहलीने लगावलं पण चर्चेत राहीलं ते श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याचं शतक.
खरंतर दासुना शनाका ९८ धावांवर रनआऊट होणार होता पण टीम इंडियाने त्याला एक जीवदान दिलं.
झालं असं की, दुसऱ्या डावात ५० व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने मंकडिंग करत श्रीलंकेच्या दासुन शनाकाला आऊट केलं.
शनाका इस वक्त ९८ धावांवर होता, शमीच्या अपीलवर अंपायरने शनाकाला आऊट देखील दिलं.
पण रोहित शर्मा पुढे आला आणि अपील वापस घेतलं आणि शनाकाला जीवनदान मिळालं.
रोहित शर्माच्या या कृतिची सर्वत्र चर्चा होत आहे, त्याच अनेकजण कौतुक देखील करत आहेत.
रोहितमुळेच दासुनला ५० व्या ओव्हरमध्ये शतक पूर्ण करता आले. तो ८८ चेंडूत १०८ धावा करत नाबाद राहिला.
इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिलने काही दिवसांपूर्वी मांकडिंगला लीगल रन आऊटच्या यादीत टाकले आहे.
जेव्हा गोलंदाज चेंडू फेकण्याआठी नॉन स्ट्राइक वर असलेल्या फलंदाजाला रन आऊट करतो त्याला मांकडिंग रनआऊट असे म्हणतात.