Iphone: जगात हा एकमेव देश आहे जिथे आयफोन बॅन झालाय, कारण...

| Sakal

आयफोनचा नाद जगभरात सर्वांनाच आहे. आज अॅप्पलचा नवा आयफोन १४ लाँच होत आहे. या फोनची सर्वजण वाट पाहतायत.

| Sakal

मात्र एका देशात या आयफोनवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्या देशातल्या लोकांचा हिरमोड होणार आहे.

| Sakal

ब्राझीलमधल्या न्याय मंत्रालयाने अॅपलला २.३८ मिलियन डॉलरचा दंड ठोठावला आहे आणि आयफोन १२ सह सगळ्या नव्या मॉडेल्सची विक्री रद्द केली आहे.

| Sakal

तसंच जे आयफोन चार्जरशिवाय मिळतील, त्यांची विक्रीही थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

| Sakal

आयफोनकडून ग्राहकांशी भेदभाव होत असल्याचं म्हटलं आहे. कंपनीकडून फोनचा चार्जर दिला जात नसल्याने मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे.

| Sakal

चार्जरसंबंधी अॅपलकडून मांडण्यात आलेला पर्यावरण रक्षणाचा मुद्दा खोडून काढण्याल आला आहे.

| Sakal

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी चार्जर देण्यात येत नाही, असं अॅपलने सांगितलं होतं.

| Sakal

त्यामुळे पर्यावरण सुरक्षेला हातभार लागेल, असंही सांगितलं होतं. पण त्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे मंत्रालयाने आयफोनला विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

| Sakal