1 बेन स्टोक्स
बेन स्टोक्स हा अष्टपैलू खेळाडू असल्याने प्रत्येक फ्रेंचायजी त्याच्या मागे हात धुवून मागे लागेल. यापूर्वीही स्टोक्सवर हंगामातील सर्वाधिक बोली लागली होती. यंदाच्या लिलावात तो ख्रिस मॉरिसचे 16.25 कोटी रूपयांची सर्वाधिक बोली लागण्याचा विक्रम मोडतो का हे पहावे लागले.
2 कॅमेरून ग्रीन ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने देखील भारताविरूद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केली होती. त्य्मुळे त्याच्यावर देखील यंदा फ्रेंचायजींची नजर असेल. त्याची स्फोटक फलंदाजी आणि उपयुक्त गोलंदाजी पाहता त्याला चांगली बोली लागू शकते. त्याने आपली बेस प्राईस 2 कोटी रूपये ठेवली आहे.
3 सॅम करन
चेन्नई सुपर किंग्जकडून गेले हंगामा गाजवणारा सॅम करन देखील यंदाच्या लिलावातील एक लक्षवेधी खेळाडू ठरू शकतो. करनसाठी त्याची जुनी फ्रेंचायजी चेन्नई सुपर किंग्ज चांगलाच जोर लावू शकते. त्याने टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील चांगली कामगिरी केली असून त्याच्यासाठी अनके फ्रेंचायजी पाण्यासारखा पैसा खर्च करण्याच्या तयारीत नक्कीच असतील.
4 सिकंदर रझा
झिम्बाब्वेचा हा फिरकी अष्टपैलू खेळाडू टी 20 वर्ल्डकपमध्ये धमाल करून गेला. त्यामुळे त्याच्यावर देखील यंदाच्या लिलावात पैशांचा पाऊस पडू शकतो.
5 नारायण जगदीशन
नारायण जगदीशनने विजय हजारे ट्रॉफीत 830 धावा केल्या असून त्याने सलग 5 शतके ठोकण्याचा कारनामा देखील केला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावात त्याच्यावरही लक्ष्मीची कृपा होऊ शकते.