इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला पंजाब किंग्जने 2023 च्या लिलावात 18.50 कोटींना विकत घेतले.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कैमरून ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 2023 च्या मिनी लिलावात तो 17.50 कोटींना मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये येतो. कोहलीला 2018 मध्ये आरसीबीने 17 कोटींमध्ये टीममध्ये रिटेन केलं होतं.
केएल राहुलला लखनौने 17 कोटींमध्ये कर्णधार म्हणून घेतले होते. पण आता तेही मागे पडले आहेत.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात 16.50 कोटींना विकत घेतले.
कोलकाता नाईट रायडर्स टीमने मागील वर्षी आयपीएलच्या बाराव्या सीजनमध्ये ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिंस याला 15.5 कोटीला खरेदी केलं होतं.
आयपीएलचा यशस्वी कर्णधार असलेला महेंद्र सिंह धोनीला 2018 मध्ये आयपीएल फ्रेंचाइजी चेन्नई सुपरकिंग्स ने 15 कोटींना रिटेन केलं होतं.