जान्हवी कपूर आणि तिच्या 5 अजब सवयी

| Sakal

जान्हवीने एकदा एका मुलाखतीत सांगितलं होतं की ती कुठल्याही सिनेमाच्या सेटवर गेली किंवा कोणाच्याही घरी गेली की प्रथम तिचा उजवा पाय आधी पुढे करते.

| Sakal

जान्हवी असं देखील म्हणाली होती की ती कोणत्याही सिनेमातील सीन पाहत असेल तर ती ५ ते ६ वेळा त्याला पॉज करते आणि सारखं-सारखं पाहते. आणि मग आरशा समोर जाऊन स्वतः Acting करते.

| Sakal

जान्हवीमध्ये आणखी एक अजब सवय आहे. कधी कोणतं गाणं ती ऐकत आहे आणि सोबत गातही आहे पण तेव्हाच ते गाणं नेमकं मध्येच बंद पडलं , तर ती पुन्हा ते गाणं प्ले करते आणि गायला सुरुवात करते.

| Sakal

जान्हवी तिच्या वर्कआऊट विषयी खूपच क्रेझी आहे. कधी तो मिस झाला तर तिला नको तेवढं टेन्शन येतं.

| Sakal

जाव्हवी जगात कुठेही, आणि कुठल्याही कोपऱ्यात आंघोळ करू शकते. तिच्या या सवयीचा खुलासा तिचा भाऊ अर्जुन कपूरने केला होता.

| Sakal

जान्हवी नुकतीच करण जोहरच्या कॉफी विथ करण ७ या शो मध्ये सामिल झाली होती आणि तिनं अनेक खळबळजनक खुलासे केले होते.

| Sakal

जान्हवीचा गूड लक जेरी सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या व्यतिरिक्त ती मिस्टर अॅन्ड मिसेस माही, बवाल सारख्या सिनेमातून दिसणार आहे. २०१८ साली सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलेली जान्हवी एका सिनेमासाठी ५ करोड मानधन घेते.

| Sakal