सकाळ डिजिटल टीम
एम जे अकबर हे सध्या नरेंद्र मोदी सरकारमधील परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आहेत. ते एक ज्येष्ठ पत्रकार म्हणूनही ओळखले जातात. अकबर यांनी भारतातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रांचे संपादकपदही भूषविले आहे.
अरुण शौरी भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते अरूण शैरी हेदेखील पत्रकार आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक होते.
राजीव शुक्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला हे पत्रकार आणि टीव्ही अँकर होते. शुक्ला यांना 2000 मध्ये राज्यसभेवर उमेदवारी मिळाली. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
चंदन मित्रा मित्रा यांनी कोलकाता येथील द स्टेट्समनच्या सहाय्यक संपादक म्हणून पत्रकारीतेत सुरुवात केली. 2003 मध्ये त्यांना राज्यसभेवर नामांकन देण्यात आले आणि जून 2010 मध्ये ते भाजपकडून खासदार म्हणून पुन्हा निवडून आले.
शाझिया इल्मी माजी स्टार न्यूजच्या अँकर शाझिया इल्मी यांनी टेलिव्हिजन न्यूज आणि माहितीपट निर्मिती क्षेत्रात १५ वर्षे काम केले. अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखालील इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर त्या आपमध्ये सामील झाल्या. २०१४ मध्ये पक्षांतर वादानंतर त्यांनी पक्षाला रामराम करत २०१५ मध्ये भाजपात प्रवेश केला.
आशुतोष आधी आज तक आणि नंतर IBN7 वर टीव्ही न्यूज अँकर म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेले आशुतोष यांनी 2014 मध्ये आपमध्ये प्रवेश केला. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली मात्र, यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
मनीष सिसोदिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी भारतीय विद्या भवनमधून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. 1997 ते 2005 पर्यंत त्यांनी डॉक्युमेंटरी फिल्म मेकर आणि टीव्ही न्यूजरीडर म्हणून काम केले.
आशिष खेतान तहलकाचे पत्रकार म्हणून आशिष खेतान सर्वांना परीचित आहेत. याशिवाय ते त्यांच्या शोध पत्रकारितेसाठीदेखील ओळखले जातात. २००७ मध्ये त्यांनी गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींबाबतचा स्टिंग ऑपरेशनवरील द ट्रुथ : गुजरात २००२ अहवाल प्रसिद्ध केला. 2014 मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.