Nysa Devgn Photos : सुपरस्टार कपल काजोल आणि अजय देवगण यांची लाडकी मुलगी न्यासा देवगण सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झालीये.
बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा आता तिच्या ड्रेसमुळं चर्चेत आली आहे.
न्यासानं अलीकडंच अनिता डोंगरे यांनी डिझाइन केलेला सुंदर लाल लेहेंगा परिधान केला होता.
न्यासा देवगनचा लाल लेहेंग्यातला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट राधिका मेहरानं 8 मार्चला न्यासाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते.
न्यासा लाल लेहेंगा, खोल गळ्यातील चोलीमध्ये जबरदस्त दिसत आहे. यासोबतच न्यासानं मॅचिंग एम्ब्रॉयडरी केलेला दुपट्टाही घेतला आहे.
न्यासानं परिधान केलेल्या लेहेंग्याची किंमत डिझाइन लेबलच्या वेबसाइटवर 1.75 लाख रुपये आहे.
काजोल आणि अजय देवगणच्या मुलीनं तिचं शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये केलं. नंतर सिंगापूरमधील युनायटेड कॉलेज ऑफ साउथईस्ट एशियामध्ये शिक्षण घेतलं.
न्यासा देवगन सध्या स्वित्झर्लंडच्या ग्लायॉन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचं शिक्षण घेत आहे.