कंगनाचे धाबे दणाणले...

| Sakal

कंगनानं धाकड फ्लॉप झाल्याचा मोठा धसका घेतल्यानं आगामी 'तेजस' सिनेमाचं रिलीज पुढे ढकलण्यात आल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

| Sakal

रॉनी स्क्रुवालाच्या प्रॉडक्शन अंतर्गत बनलेला हा सिनेमा आता पुढील वर्षीच प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. सुरुवातीला हा सिनेमा ५ ऑक्टोबर २०२२ रोजी रिलीज होणार होता.

| Sakal

२० मे ला रिलीज झालेल्या कंगनाच्या 'धाकड' सिनेमानं फक्त २.३० करोड रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर केल्याचं बोललं जात आहे. या सिनेमाचं एकूण बजेट ९३ करोड इतकं होतं.

| Sakal

कंगनाचा 'तेजस' सिनेमा बनून तयार आहे. पण याचं VFX संबंधित काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. पण निर्मात्यांनाही रिलीजची घाई नसल्यानं हे काम थांबवण्यात आलं आहे.

| Sakal

सध्या सिनेमा जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार अशी उडती खबर असली तरी रिलीज डेटविषयी काहीच बातमी समोर आलेली नाही.

| Sakal

गेल्या सात वर्षांपासून कंगना एका हीटची प्रतिक्षा करतेय. बॉक्सऑफिसवर तिच्या एकाही सिनेमानं बजेटसाठी खर्च झालेले पैसेही गेल्या ७ वर्षात कमावून दिलेले नाहीत.

| Sakal

आगामी 'तेजस' बाबतीत कंगनाला कोणतीच रिस्क घ्यायची नाही,त्यामुळे सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात तिचीही सहमती असल्याचं बोललं जात आहे.

| Sakal