कपिल शर्मा शो च्या नव्या सीझनसाठी कपिलनं वाढवलं लाखोंनी मानधन

| Sakal

कपिल शर्मा शो सुरु व्हायला आता काहीच दिवसांचा अवधी आहे. शॉर्ट ब्रेकनंतर पुन्हा कपिल शर्मा शो १० सप्टेंबरला सुरु होत आहे.

| Sakal

कपिल शर्मा शो च्या नवीन सीझनसोबत आता ५ नवीन कलाकार जोडले जाणार आहेत. शोचा नवीन प्रोमो सध्या भलताच चर्चेत आहे.

| Sakal

बोललं जात आहे की नव्या सीझनमध्ये कपिलच्या मानधनाचा आकडाही वाढला आहे.

| Sakal

कपिल शर्मा शो च्या दुसऱ्या सीझनमध्ये ३० ते ३५ लाख इतका कपिलच्या मानधनाचा आकडा होता.

| Sakal

कपिल शर्मा शो च्या नव्या सीझनसाठी कपिलनं प्रत्येक एपिसोडगणिक ५० लाख रुपये चार्ज केल्याचं बोललं जात आहे.

| Sakal

नव्या सीझनसाठी अर्चना पूराणसिंगनंही आपलं मानधन वाढवलं असून एका एपिसोडसाठी तिला १० लाख रुपये देण्यात येणार आहेत. शो मध्ये चहावाल्याची भूमिका करणारा कॉमेडियन चंदन प्रभाकर एका एपिसोडसाठी ७ लाख, सुमोना चक्रवर्ती ६ ते ७ लाख तर कीकू शारदा ५ ते ६ लाख मानधन घेणार असल्याचं कळत आहे.

| Sakal

नव्या सीझनमध्ये कृष्णा अभिषेकी दिसणार नसला तरी ५ नवे कलाकार एन्ट्री करणार आहेत. यामध्ये सिद्धार्थ सागर,गौरव दुबे,सृष्टी रोडे,इश्तियाक खान,श्रीकांत जी मस्की यांचा समावेश आहे. यांच्या मानधनाचा आकडा समोर आलेला नाही.

| Sakal