Kawasaki Ninja 300 भारतात लाँच! पाहा किंमत आणि फीचर्स

Sudesh

Kawasaki Ninja 300

जपानी स्पोर्ट्स बाईक बनवणारी कंपनी कावासाकीने आपली निंजा 300 ही बाईक भारतात लाँच केली आहे.

Kawasaki Ninja 300 | Esakal

बुकिंग

भारतात या गाडीचं बुकिंग सुरू करण्यात आलंय. यापूर्वीच्या निंजा बाईकचं हे अपडेटेड व्हर्जन आहे.

Kawasaki Ninja 300 | Esakal

इंजिन

यामध्ये सिंगल सिलेंडर असलेलं 296 CC क्षमतेचं इंजिन दिलं आहे. हे लिक्विड कूल्ड इंजिन 38.5 bhp पॉवर आणि 26.1 Nm पीक टॉर्क जनरेट करतं.

Kawasaki Ninja 300 | Esakal

BS6

कावासाकीमध्ये देण्यात येणारं इंजिन BS6 Phase 2 च्या नियमांप्रमाणे आहे. यामध्ये OBD2 पोर्ट येतो. यामुळे यात E20 इंधनही वापरता येतं.

Kawasaki Ninja 300 | Esakal

गिअरबॉक्स

यामध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे, जो रिअर व्हीलला सपोर्ट करतो. यासोबतच बाईकमध्ये असिस्ट आणि स्लीपर क्लच देण्यात आला आहे.

Kawasaki Ninja 300 | Esakal

ब्रेकिंग

कावासाकी निंजा 300 च्या फ्रंट व्हीलमध्ये 290 mm पेटल डिस्क ब्रेक आणि रिअर व्हीलमध्ये सिंगल पिस्टन कॅलिपर असणारा 220 mm पेटल डिस्क ब्रेक देण्यात आलाय.

Kawasaki Ninja 300 | Esakal

सस्पेंशन

या बाईकच्या पुढच्या भागात 37 mm टेलिस्कोपिक सस्पेंशन दिलंय, तर मागच्या भागात युनिट्रॅक मोनो-शॉक सस्पेंशन दिलं आहे.

Kawasaki Ninja 300 | Esakal

तीन कलर्स

ही बाईक तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. इबोनी (ब्लॅक), लाईम ग्रीन आणि कँडी लाईम ग्रीन असे तीन ऑप्शन्स आहेत.

Kawasaki Ninja 300 | Esakal

किंमत

भारतामध्ये लाँच करण्यात आलेल्या Kawasaki Ninja 300 ची स्टार्टिंग प्राईज 3.43 लाख रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kawasaki Ninja 300 | Esakal