खुशी कपूर: नवी उर्फी जावेद, का होतेय ट्रोल?

| Sakal

सिनेनिर्माता बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची छोटी मुलगी खुशी कपूर लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. झोया अख्तरच्या 'द आर्चिस' सिनेमातून ती आपल्याला लवकरच दिसणार आहे.

| Sakal

खुशी नेहमीच सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि करिअरविषयी अपडेट देताना दिसते. अनेकदा खूशी तिचे खूप सुंदर फोटोशूट शेअर करते.

| Sakal

नुकतेच तिने ब्लॅक ड्रेसमधील तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ब्लॅक स्किन हग कट ड्रेसला त्रिकोणी झिग झॅग कट्स आहेत. बोल्ड मेकअप आणि न्यूड लिप्स असा एकंदरीत तिचा लूक त्या ब्लॅक ड्रेसमध्ये आहे. खुशी यामध्ये भलतीच बोल्ड दिसत आहे.

| Sakal

दिवसागणिक खूशीच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसतेय ते तिच्या स्टायलिश आणि बोल्ड फोटोंमुळे. तिनं ब्लॅक ड्रेसमध्ये शेअर केलेल्या फोटो पोस्टला कोणतेच कॅप्शन दिलेलं नाही. तिचे हे फोटो पाहून चाहते मात्र शॉकमध्ये आहेत.

| Sakal

खुशीच्या या फोटोंवर हॉट,सेक्सी,बोल्ड असे कमेंट्स वाचायला मिळत आहेत. खुशीच्या फोटोवर अभिनेत्री दीपिका पदूकोण ते बहिण जान्हवी कपूरपर्यंत साऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलेला आहे.

| Sakal

पण खुशीला या फोटोवरुन ट्रोल करुन ज्या कमेंट ट्रोलर्सनी नोंदवल्या आहेत त्या मात्र भयंकर आहेत. खुशीला काहींनी 'नवी उर्फी जावेद' म्हणूनही हिणवलं आहे.

| Sakal

अभिनेत्री करिश्मा कपूर,अनुराग कश्यप,आलिया कश्यप,शनाया कपूर, महीप कपूर,मनीष मल्होत्रा यांनी देखील खुशीच्या फोटोवर कमेंट्स दिल्या आहेत. झोया अख्तरच्या 'द आर्चिस' मध्ये खुशी सोबत शाहरुखची मुलगी सुहाना आणि अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा देखील काम करत आहेत.

| Sakal