बॉलिवूड स्टार्स कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकणार आहेत.
6 फेब्रुवारीला ते लग्न करणार आहेत.
लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली असून पाहुणेही जैसलमेरला पोहोचू लागले आहेत.
4 आणि 5 फेब्रुवारी रोजी संगीत, मेहेंदी आणि हळदी समारंभांसह प्री-वेडिंग फेस्टिवल होणार आहेत
राजस्थानमधील जैसलमेर येथे ते लग्न करतील.
त्यांच्या लग्नानंतर, सिद्धार्थ आणि कियारा दोन रिसेप्शन आयोजित करण्याची योजना आखत आहेत.
दरम्यान कियाराचे याआधीचे काही वेडिंग लुक्स व्हायरल झाले आहे.