मेथी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात बाजारात उपलब्ध असते. मेथीपासून अनेक प्रकारच्या डिशेश बनवता येतात.
काही भाज्यांची चव वाढवण्यासाठी कसुरी मेथी आवर्जून टाकली जाते.
मेथीची पानं काढून घ्या, लक्षात ठेवा पानं काढताना तुम्हला त्यात देठ घ्यायचे नाहीयेत. आता या पानांना व्यवस्थित धुवून घ्या आणि चाळणीत सुकवायला ठेऊन द्या.
पाणी निथळल्यावर मायक्रोवेव्ह फ्रेंडली ट्रे (microwave) घ्या यात हि पानं व्यवस्थित पसरवुन घ्या मायक्रोवेव्ह हाय टेम्परेचरला सेट करा आणि ३-४ मिनिट ठेऊन द्या.
ट्रे बाहेर काढून घ्या, पसरवलेली पानं पुन्हा एकदा हलवून घ्या आणि २ मिनिटासाठी पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये ठेऊन द्या. यानंतर काही वेळा साठी पूर्ण पाने थंड होऊ द्या.
जेव्हा मेथीची पानं पूर्णपणे थंड होतील तेव्हा दोन्ही हातात घेऊन ती रगडून पावडर बनवून घ्या.ही पावडर एका हवाबंद डब्ब्यात भरून ठेऊन द्या.
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह (preservative) न वापरता घरच्या घरी वर्षभर पुरेल एवढी कसुरी मेथी बनून तयार!