KL Rahul : भावी कर्णधाराची श्रीमंती

| Sakal

भारताचा उपकर्णधार केएल राहुलकडे भारताचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जाते.

| Sakal

केएल राहुल हा भारताचा तीनही क्रिकेट फॉरमॅटचा एक अव्वल फलंदाज आहे.

| Sakal

आता तो लखनौ सुपर जायंट आयपीएल संघाचे नेतृत्व देखील करतोय.

| Sakal

यश आले की पैसा, वैभव वाढतेच, केएल राहुलच्या देखील संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे.

| Sakal

केएल राहुलची निव्वळ संपत्ती किती?

केएल राहुल हा आयपीएलमधील करारामधून सर्वाधिक संपत्ती कमवतो. लखनौ सुपर जायंटने त्याला 17 कोटी रूपये देऊन करारबद्ध केले आहेत. त्याची 2022 मधील निव्वळ संपत्ती ही 70 कोटी इतकी आहे.

| Sakal

केएल राहुलची घरे किती?

बंगळुरूमधील केएल राहुलच्या घराची किंमत ही 65 लाख रूपये इतकी आहे. देशभरात विविध ठिकाणी देखील केएल राहुलची संपत्ती आहे. गोव्यात त्याचे व्हिला मिलेना नावाचे हॉलिडे होम आहे. 7000 स्क्वेअर फूट जागेत पसरलेले हे हॉलिडे होम पोर्तुगीज स्थापत्यकलेचा नुमना असून या घरात स्विमिंग पूल, अँटिक फर्निचर, प्रशस्त डायनिंग देखील आहे.

| Sakal

राहुलची सवारी?

केएल राहुलकडे गाड्यांचे चांगले कलेक्शन आहे. त्याच्याकडे 5 कोटीची Huracan Spyder, 2 कोटीची Audi R8, याचबरोबर 4 कोटी किंमतीच्या लक्झुरियस गाड्या आहेत. त्यात Mercedes-Benz AMG C43, BMW 5 Series, Range Rover Velar, Mercedes-Benz GLS आणि नुकतीच घेतलेली BMW X7 या गाड्यांचा समावेश आहे.

| Sakal

उंची घड्याळांचा शौकिन केएल

केएल राहुलकडे महागड्या गाड्यांबरोबरच घड्याळांचे देखील चांगले कलेक्शन आहे. यात रोलेक्स, डे डेट 18 कॅरेटचे रोज गोल्ड घड्याळ, कॉसमोग्राफ डायोटना, डेटजस्ट ऑयस्टर यलो गोल्ड, पानेरै रॅडियोमिर 1940, हुबोल्ट क्लासिक फ्युजन सेरामिक किंग गोल्ड, ऑडेमरास पिग्वेट रॉयल ओक स्टेनलेस्टील आणि पाटेक फिलिपे लाटिलुस 57121/A अशा घड्याळांचे कलेक्शन आहे.

| Sakal