जाणून घ्या तुपाचे फायदे

| Sakal

अनेक वेळा मुरुम किंवा कडक सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर जळण्याच्या खुणा तयार होतात. अशा स्थितीत झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर तूप लावून हे डाग किंवा जखमा दूर केल्या जाऊ शकतात.

| Sakal

डोळे थोडे अंधूक आणि थकलेले वाटत असतील तर तूपाचा वापर करा. तसेच डोळ्यांच्या बाजूच्या भागाला तूपाने मसाज केल्यास त्याचा काही दिवसांनी फरक जाणवून सातत्याने थकलेल्या वाटणाऱ्या डोळ्यांना आराम मिळू शकतो.

| Sakal

तेलामध्ये 5 चमचे तूप टाकून ते मिश्रण एकत्र करुन अंगाला लावल्यास स्किन मऊ होते.

| Sakal

चेहऱ्यावरील सूज रोखण्यासाठी रात्री झोपताना तूप लावा आणि दुसऱ्या दिवशी पाण्याने चेहरा धुण्यापूर्वी सूती कपड्याने चेहरा स्वच्छ करा.

| Sakal

हिवाळ्यात फाटलेल्या ओठांच्या समस्येमुळे खूप त्रास सहन करावा लागतो. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर तूप लावा. यामुळे तुमची समस्या दूर होईल.

| Sakal