भारतात प्रत्येक जण चहा किंवा कॉफी पितोच, बऱ्याच जणांना दिवसाच्या सुरूवातीलाच चहा-कॉफी हवे असते.
काही लोकांना वाटतं की चहा कॉफी पिल्याने वजन कमी होतं, हे खरं आहे का?
घरोघरी दररोज बनवल्या जाणाऱ्या चहा कॉफीमध्ये हाय फॅट दूध आणि साखर वापरली जाते.
तज्ञांच्या मते अशा प्रकारची कॉफी-चहा घेतल्याने उलट वजन वाढण्याचा धोका असतो.
चहा-कॉफीच्या सेवनाने बऱ्याच जणांना नीट झोप लागत नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे, झोप कमी झाल्याने उलट वजन वाढतं.
बऱ्याच जणांना चहा कॉफीने भूक कमी लागते असं वाटतं पण हे साफ खोटं आहे.
तज्ञांच्या मते चहा-कॉफीच्या सेवनाने मेटाबॉलिजम रेट वाढतो ज्यामुळे चरबी बर्न करण्यात मदत होते.
पण नियमीत चहा-कॉफी पिल्याने शरीरात त्याविरोधात प्रतिकारात्मक शक्ती तयार होते, अन् चहा-कॉफी पिल्याने तरबी बर्न होण्याचा इफेक्ट संपतो.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, योग्य सल्ल्यासाठी तज्ञांची मदत घ्या.