स्वयंपाकातले छोटेसे बदल तुम्हाला आरोग्यदायी जीवनशैली देतील!

वैष्णवी कारंजकर

घरी पनीर बनवल्यावर त्यातले उरलेले पाणी फेकून न देता या पाण्याचा वापर करून डाळी, उसळी, भाज्या बनवाव्यात किंवा त्या पाण्याचा वापर करून कणीक मळावी.

Paneer | Sakal

पदार्थ बनवताना वाफवणे, भाजणे, उकडणे, ग्रील, सॉस इत्यादी पद्धतीने बनवावेत.

Cooking Tips | Sakal

भाज्यांची साले काढण्यापेक्षा त्या स्वच्छ धुऊन त्यांच्या सालींचा वापर चटणी, थालीपीठ, पराठे इत्यादींमध्ये करावा.

Cooking Tips | Sakal

भाज्या जास्त पचपचीत शिजल्या, तर त्यांतील आहारमूल्ये नष्ट होतात. म्हणून भाज्या वाफेवर कमी वेळ शिजवाव्यात.

Cooking Tips | Sakal

चवीसाठी लिंबू, हर्ब्ज, कांदा, टोमॅटो, चिंच, आमसुले इत्यादींचा वापर करावा. सोयाबीन, अतिरिक्त तेल व तूप यांचा वापर टाळावा.

Cooking Tips | Sakal

पॉलिश्ड धान्ये न वापरता सालासकट धान्ये वापरावीत.

Grains | Sakal

पालेभाज्या लोखंडी भांड्यामध्ये शिजवाव्यात व लगेच वेगळ्या स्टील भांड्यांमध्ये काढाव्यात.

Iron Container | Sakal

रोजच्या जेवणात कमीत कमी दोन वाट्या कच्ची भाजी/ सॅलड/ कोशिंबीर/ रायता या स्वरूपात घ्यावी.

Salad | Sakal

वेगवेगळी पिठे वापरताना, ती चाळून घेऊ नयेत.

Flour | Sakal

आहारामध्ये पाण्याबरोबरच ताक, लिंबूपाणी, नारळाचे पाणी, सूप इत्यादींचा समावेश करावा.

Lemon Water | Sakal

स्थानिक व ऋतूप्रमाणे फळे व भाज्यांचा आहारात समावेश करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vegetables | Sakal