चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे.
अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.
जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.
डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
डाळिंबाच्या सालीचा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस चोखल्याने जुनाट खोकला नाहीसा होतो.
ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.
घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.