शीतली म्हंटलं एकच चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर
शिवानीने झी मराठी वरील 'लगिर झालं जी'या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केले.
ही मालिका इतकी हीट झाली की, शितली महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
तिचा चाहतावर्ग इतका मोठा आहे की तिला पाहण्यासाठी लोक आतुर असतात.
नुकतीच तिच्या नव्या मालिकेची घोषणा झाली.
पुन्हा एकदा ती झी मराठीवर 'लवंगी मिरची' या मालिकेतून दमदार पदार्पण करत आहे.