'ताश्कंत करार'चं ऐतिहासिक निर्णय होण्यामागे लाल बहादूर शास्त्री यांचे मोठे योगदान होते.
पण 10 जानेवारी रोजी या करारावर सही झाली आणि 11 जानेवारी रोजी शास्त्री यांचे निधन झाले.
पण त्यांचे निधन ही त्यांची हत्या असल्याचे बोलले गेले.
यावर प्रचंड अभ्यास करून विवेक अग्नीहोत्री यांनी 'द ताश्कंत फाईल्स' हा चित्रपट केला.
पण केवळ चित्रपट करून थांबले नाही, ही माहिती.. शास्त्री यांचे कार्य आणि त्यांचे हत्येचं गूढ जगभरात पोहोचवण्यासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला.
त्यासाठी अग्नीहोत्री यांनी 'हू किल्ड शास्त्री' नावाचे पुस्तक लिहिले, ज्याची जगभरात विक्रमी विक्री झाली.
याला इतका प्रतिसाद मिळाला की काही दिवसांपूर्वीच या पुस्तकाचा हिन्दी भाषेतील अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला.