लालबागच्या राजाची शान पाहून डोळ्यांचं पारणं फिटेल!

| Sakal

आज अनंत चतुर्दशीच्या मुहुर्तावर राज्यभरात मोठा जल्लोष आहे. ठिकठिकाणच्या गणपतींचं आज विसर्जन होत आहे. दरम्यान, मुंबईतला प्रसिद्ध लालबागचा राजाही विसर्जनासाठी निघाला आहे.

| Sakal

अरबी समुद्रात लालबागचा राजाचं आज विसर्जन होणार आहे.

| Sakal

२०१६ पासून या मुंबईतल्या प्रसिद्ध गणपतीचं विसर्जन हायड्रॉलिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं केलं जातं. एका छोट्या बोटीतून हा गणपती नेला जातो आणि समुद्राच्या मधोमध विसर्जन केलं जातं.

| Sakal

अपेक्षित ठिकाणी गेल्यानंतर बोटीचा काही भाग तिरका केला जातो आणि मग लालबागचा राजाचं विसर्जन होतं.

| Sakal

दरवर्षी या गणपतीला लाखो, कोट्यवधी रुपयांचं दान दिलं जातं. सोनं, चांदी शिवाय परदेशी चलनाच्या रुपात लालबागचा राजाला देणगी दिली जाते.

| Sakal

यावर्षीची देणगी रक्कम ५ कोटींच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. विसर्जनानंतर देणगीची रक्कम मोजली जाईल आणि जाहीर केली जाईल.

| Sakal

मोठमोठे नेतेही या राजाच्या दर्शनाला हजेरी लावतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही दरवर्षी या राजाच्या दर्शनाला येत असतात.

| Sakal

दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या धामधुमीत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. लालबागचा राजाच्या या १४ फुटी मूर्तीचे कपडे दररोज बदलले जातात. भाविक या राजाच्या दर्शनासाठी मोठी रांग लावत असतात. दिवसरात्र ही रांग सुरूच असते.

| Sakal