Vinayak Mete Death: मराठा समाजाला न्याय देणारा चेहरा हरपला

| Sakal

आज सकाळी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचं निधन झालं.

| Sakal

पाच वेळा विधान परिषद सदस्यत्व मिळविण्याचे रेकॉर्ड एकमेव विनायक मेटे यांच्या नावावर आहे.

| Sakal

मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांचे वय वाढविणे अशा विषयांसाठी त्यांनी पुढाकार घेतला.

| Sakal

मराठा समाज नेहमीच सत्तेतला मानला गेला. पण या राज्यात मराठा शेतकरी, शेतमजूर आहेत. त्या समाजाला न्याय देणारा चेहरा म्हणजे विनायक मेटे होते.

| Sakal

विनायक मेटे मराठा आरक्षणासाठी प्रचंड आग्रही होते. त्यांना जिथे संधी मिळेल, तिथे प्रश्न मांडत होते.

| Sakal

त्यांच्या अपघाती निधनाच्या घटनेमुळे हजारो कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

| Sakal

विनायक मेटे बेधकडपणे समाजाला न्याय देण्यासाठी आपली भूमिका मांडायचे. त्यामुळे त्यांचं निधन हा मराठा समाजासाठी खुप मोठा धक्का आहे.

| Sakal

त्यांच्या निधनावर अनेक नेते-कार्यकर्त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देत त्यांना श्रद्धांजली वाहली.

| Sakal