जगातील सर्वांत जुने ‘लेदर शूज’ आर्मेनियातील एका गुहेत सापडले आहे. हे शूज ५.५ हजार वर्ष जुने आहे.
जगातील सर्वांत जुने चाक पाच हजार वर्षे जुने आहे आणि ते लाकडी आहे.
मानवी शरीरातील रक्तवाहिन्या तब्बल ६० हजार मैल म्हणजेच ९६ हजार ५६० किलोमीटर पेक्षा जास्त लांब असतात.
पृथ्वीला एक आवरण घालता येईल एवढे सोने पृथ्वीच्या पोटात आहे.
ब्लू व्हेल मासा एका घासात जवळपास अर्धा दशलक्ष कॅलरीज खातो.
म्हणजेच ब्लू व्हेल ५०० किलो क्रिल मासे एकाच घासात खातो.
आकाशातील क्युम्युलस या ढगाचे वजन ५ लाख किलोग्रॅम एवढे असू शकते.
हे वजन एका ब्लू व्हेल माशाच्या वजनापेक्षा चारपटीपेक्षा जास्त आहे.
ढग एखाद्या वेगवान जेट विमानासारखेच शंभर माईल्स प्रति तास म्हणजेच १६० किलोमीटर प्रतितास पेक्षा जास्त वेगाने धावू शकतात.